जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाणी वितरणाची अचानक पाहणी

By Admin | Published: May 11, 2016 12:16 AM2016-05-11T00:16:20+5:302016-05-11T00:20:26+5:30

लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़

District Collector has conducted a sudden survey of water distribution | जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाणी वितरणाची अचानक पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाणी वितरणाची अचानक पाहणी

googlenewsNext

लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़ गरीब वसाहतींमध्ये टँकर चालक व कर्मचाऱ्यांची मनमानी आहे़ ठराविक भागात मात्र मुबलक पाणी पुरवठा केला जात आहे़ मनपाचे अनेक प्रभाग अधिकारी घरात बसून टँकरचालकांच्या विश्वासावर वितरण करीत आहेत़ नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अचानक मंगळवारी शहरातील काही भागाची पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी केली़
लातूर शहरासाठी उपलब्ध होणारे पाणी ४ जलकुंभातून सुमारे १३५ टँकरद्वारे वितरण केले जात आहे़ मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी प्रभागनिहाय पाणी वाटपाचे नियोजन करून दिले़ कधी कोणत्या भागात टँकर जाणार याचा सर्व लेखाजोखा तयार करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुचराईपणामुळे नियोजन विस्कटले आहे़ प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी टँकरवर असतात़ काही भागात नगरसेवकांचे कार्यकर्तेच पाणी वाटप करतात़ गरीब वसाहतींमध्ये पाणी वाटप करताना सरकारी पाण्याची मालकी टँकरचालकाकडे असते़ कुणाला किती पाणी द्यायचे, हे त्या टँकरचालक किंवा सोबतच्या रोजंदारीवरील कामगारावर अवलंबून आहे़ मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अचानक पाणी वितरणाची पाहणी सुरू केली़ जवळपास ३ तास भर उन्हात त्यांनी विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला़

Web Title: District Collector has conducted a sudden survey of water distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.