तूर खरेदीतील दोषींवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:32 AM2017-08-02T00:32:35+5:302017-08-02T00:32:35+5:30
नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी तूर खरेदीशी संबंधित विभाग फिर्याद देण्यासाठी पुढे यायला तयार नसल्याने चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी मंगळवारी सांगितले.
जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून जालना, परतूर, तीर्थपुरी व अंबड येथील बाजार समित्यांमध्ये सुरू केलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्री केली. त्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. चौकशीकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, पणन अधिकारी, (पान २ वर)