शहर पाणीपुरवठा योजनेवर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:56+5:302021-04-23T04:04:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शहर पाणी पुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शहर पाणी पुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक येरेकर, उपवनसंरक्षक वन्यजीव, डी. आर. वाकचौरे, उपविभागीय अधिकारी आर. आर. रोडगे, मनपा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, संजय कोंबडे, अजित वाघमारे, उपविभागीय अधिकारी श. प. ढवळे उपस्थित होते. १६८० कोटींच्या योजनेतील कामे तीन भागात पूर्ण करावयाची आहेत. त्याअंतर्गत डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा वाढ करण्याचे नियोजन आहे. टप्पेनिहाय या प्रकल्पाच्या कामांना पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्यानुसार सर्व यंत्रणांनी मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता सिंग यांनी या प्रकल्पाच्या कृती आराखड्याची, अंमलबजावणीची माहिती बैठकीत दिली.