जिल्हा रुग्णालयातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:05 AM2021-05-20T04:05:06+5:302021-05-20T04:05:06+5:30
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी १३ मार्च रोजी ३०० ...
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी १३ मार्च रोजी ३०० रुग्ण दाखल होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. या ठिकाणी १४६ रुग्ण दाखल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
तिसऱ्या लाटेसाठी बालरोग विभाग सज्ज
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या लढाईसाठी बालरोग विभाग सज्ज होत आहे. घाटीतील बालरोगशास्त्र विभाग आणि वैद्यकीय शिक्षण युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी नवजात शिशू व बालकांतील कोरोना या विषयावर कार्यशाळा व प्रशिक्षण घेण्यात आले. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यशाळेत मनपाचे १५ आरोग्य सेवक प्रशिक्षण घेत आहेत. अशा कार्यशाळांमध्ये पुढील ३ महिने प्रशिक्षण वर्गाद्वारे डाॅक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी बालरोग विभागप्रमुख डाॅ. प्रभा खैरे, नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख, डाॅ. सरोजिनी जाधव, डाॅ. जयश्री भाकरे, डाॅ. तृप्ती जोशी, परिचारिका गायकवाड यांची उपस्थिती होती.
मध्यवर्ती बसस्थानकाचा प्रवेशद्वार बंद
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठीच बस चालविण्यात येत आहे. परंतु अत्यावश्यक सेवेसाठीही प्रवासी येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून बसेस बाहेर पडत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत आता मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश करणारा मार्गावरील गेट बंद करण्यात आला आहे. सध्या ये-जा करण्यासाठी एकच मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
घाटीतील शवविच्छेदनगृहाचे काम प्रगतीपथावर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शवविच्छेदनगृहाचे काम प्रगतीपथावर आले आहे. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, सध्या रंगकाम आणि विद्युतीकरणासंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती घाटीतील अधिकाऱ्यांनी दिली.