जिल्ह्यात ४६ सेंटरची धाड मोहिमेत तपासणी
By Admin | Published: March 24, 2017 11:48 PM2017-03-24T23:48:58+5:302017-03-24T23:52:40+5:30
लातूर सरकारी रुग्णालयापेक्षा शासनमान्य खासगी दवाखान्यांतील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने धाड मोहीम सुरू केली आहे.
हणमंत गायकवाड लातूर
सरकारी रुग्णालयापेक्षा शासनमान्य खासगी दवाखान्यांतील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने धाड मोहीम सुरू केली आहे. १५ ते २४ मार्च या ९ दिवसांत ४६ सेंटरची कसून तपासणी करण्यात आली आहे. रुग्णालयांत केलेल्या गर्भपाताच्या केसेसची पडताळणी करण्यात येत आहे.
वैद्यकीय अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, नायब तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ही तपासणी होत आहे. जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आली असून, या पथकाने आतापर्यंत १३ रुग्णालयांची तपासणी केली आहे. तर १० एमटीपी सेंटर आणि २३ सोनोग्राफी केंद्र तपासले आहेत. रुग्णालये व एमटीपी सेंटरमध्ये १२ आठवड्यांच्या आणि त्यापुढील किती केसेस गर्भपाताच्या केल्या, नर्सिंग स्टाफ, रुग्णालयाची नोंदणी, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत का, याबाबतची तपासणी धाड मोहिमेतील पथकाने केली आहे. १५ एप्रिलपर्यंत ही तपासणी केली जाणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी सांगितले.