जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांचा गौरव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:51 PM2018-01-28T23:51:24+5:302018-01-28T23:51:43+5:30
क्रीडा संस्कृती रुजावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र परिश्रम घेणाºया क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे त्यांचा ३० जानेवारी रोजी गौरव करण्यात येणार आहे. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणाºया या गौरव सोहळ्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांना महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : क्रीडा संस्कृती रुजावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र परिश्रम घेणाºया क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे त्यांचा ३० जानेवारी रोजी गौरव करण्यात येणार आहे. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणाºया या गौरव सोहळ्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांना महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष विनोद नरवडे, सौरभ भोगले, उदय डोंगरे, फुलचंद सलामपुरे, अब्दुल कदीर व सचिव गोविंद शर्मा उपस्थित राहणार आहेत.
यांचा होणार गौरव (क्रीडा शिक्षक) : प्राचार्या शशी नीलवंत (कन्नड), आशिष कान्हेड (खुलताबाद), अप्पासाहेब लघाने (पैठण), रमेश सोनवणे (गंगापूर), राजू जगताप (फुलंब्री), डी. डी. लांडगे (औरंगाबाद), नीलेश गाडेकर (सोयगाव). क्रीडा मार्गदर्शक : डॉ. माणिक राठोड, हिमांशू गोडबोले, कर्मवीर लव्हेरा, प्रवीण गायसमुद्रे, श्यामसुंदर भालेराव, लता कलवार, संजय मुंडे, प्रा. सतीश पाठक, राहुल टाक, मुकेश बाशा, अशोक जंगमे, डॉ. मोहम्मद बद्रोद्दीन, अनिल निळे, नितेश काबलिये, सुशांत शेळके, अभिजित देशमुख, संग्राम देशमुख, हर्ष जैस्वाल, चरणजितसिंग संघा, राधिका अंबे, अजय त्रिभुवन, रमेश पालवे, बाजीराव भुतेकर, महेश परदेशी, मोहन शिंदे, गणेश बेटुदे, अक्षय बिराजदार, मछिंद्र राठोड, अर्जुन भुमकर, राकेश खैरनार, स्वप्नील गुडेकर, प्रवीण शिंदे, अमरीश जोशी, रोहिदास गाडेकर, आनंद धारकर, अनिल पवार, छाया पालोदकर, जान्हवी जगताप, अनिल मिरकर, विनय साबळे, हर्षल मोगरे, योगेश उंटवाल, भाऊसाहेब मोरे, सोनाली अंबे, संदीप शिरसाठ, सचिन बोर्डे, प्रशांत जमधडे, श्रीनिवास मोतियळे, प्रवीण आव्हाळे, कैलास शिवणकर, कल्याण गाडेकर, जुनेद शेख, उदय तगारे.
या गौरव सोहळ्यास जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थिती राहावे, असे आवाहन आॅलिम्पिक संघटनेतर्फे मकरंद जोशी, कुलजितसिंग दरोगा, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. प्रदीप खांड्रे, सुरेश मिरकर, सहसचिव दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, डॉ. विशाल देशपांडे, संदीप जगताप, नीरज बोरसे, अभय देशमुख आदींनी केले आहे.