जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘पुस्तक दिन’ साजरा
By Admin | Published: June 16, 2014 11:57 PM2014-06-16T23:57:37+5:302014-06-17T01:12:58+5:30
लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व संस्थेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून ‘पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व संस्थेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून ‘पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
औसा : औसा तालुक्यातील खानापूर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत शासनाने घोषित केलेल्या पुस्तकदिनी शाळेतील सर्व मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश राठोड, गोविंद पवार, देवीदास चव्हाण, मुख्याध्यापक महादेव खिचडे, सहशिक्षक बलभीम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
औसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७५ शाळा, प्रशालेच्या सहा शाळा, खाजगी संस्थेच्या ५६ शाळा अशा एकूण १३७ शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील देवलाबाई पवार, स्तुताबाई चव्हाण, ढालाबाई चव्हाण, बुराबाई राठोड, लालूबाई चव्हाण, झिपाबाई चव्हाण यांच्यासह माता पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शालेय समितीचे अध्यक्ष उत्तम बिरादार, संदीपान बिरादार, प्रेमकुमार मानकेश्वर, मुख्याध्यापक एस.जी. पुठ्ठेवाड, व्ही.एन. दंतराव, टी.एम. पडोळे, बी.व्ही. सुगावे, टी.डी. बिरादार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच प्रारंभी गावातील मध्यवर्ती रस्त्यावरून प्रभातफेरी काढून ‘आपली मुले शाळेत पाठवा’ असे आवाहन करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचेही वाटप करण्यात आले.
प्रवेश, स्वागताने सजली शाळा...
औसा तालुक्यातील लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वहीद पटवारी, ग्रामपंचायत सदस्य मुबारक कारभारी, सिद्धाप्पा बनसोडे, भुजंग कुलकर्णी, तात्याराव कांबळे, गणपत बनसोडे, सुनीता बनसोडे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व पेन देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उपसभापती मुगळे यांनी शाळेतील विविध उपक्रमाची पाहणी करून मुख्याध्यापक सत्यनारायण वडे यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता साखरे यांनी केले.