जिल्हा संकुलात होणार क्रीडा प्रशिक्षण केंद्र...!
By Admin | Published: March 25, 2017 11:36 PM2017-03-25T23:36:03+5:302017-03-25T23:37:12+5:30
जालना : येथील क्रीडा संकुलात अद्ययावत असे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून, या अंतर्गतचा पहिला टप्पा म्हणून साडेसहा लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे
जालना : येथील क्रीडा संकुलात अद्ययावत असे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून, या अंतर्गतचा पहिला टप्पा म्हणून साडेसहा लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या काही दिवसांत या केंद्राचे काम सुरू होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतीच या निर्णयाला मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे. नागरिकांमध्ये व्यायामाची आवाड जोपासावी, खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंना गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केेंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी २०१२ मध्ये क्रीडा धोरण जाहीर करण्यात आलेले आहे.
या धोरणातील शिफारशींनुसार क्रीडापटंूच्या गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत अशा खेळांच्या प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यासाठी ६ लाख ५३ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रशिक्षण केंद्रासोबतच जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासाासाठीही अतिरिक्त निधी शासनाने देण्याची मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे. क्रीडा संकुलाचा विकास झाल्यास क्रीडा स्पर्धां घेण्याचा मार्ग मोकळा होईल. संकुल विकासासाठी उत्पन्नाचे स्त्रोत तपासून पाहणे व प्रयत्न करणेही गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)