जिल्ह्यात वर्षभरात होणार ८० शेततळे
By Admin | Published: September 9, 2015 12:09 AM2015-09-09T00:09:34+5:302015-09-09T00:27:08+5:30
जालना : जिल्ह्यात पाऊस पाठ फिरवित असला तरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ८० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
जालना : जिल्ह्यात पाऊस पाठ फिरवित असला तरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ८० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
शेततळ्याच्या माध्यमातून जलसाठा वाढावा यातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी या हेतूने कृषी विभागाकडून शेततळे उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी शेततळ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.
विशेषत: फलोत्पादक शेतकऱ्यांना यात झुकते माप देण्यात आले आहे.
यंदा प्रत्येक तालुक्यात ५ या प्रमाणे आठ तालुक्यात ४० तर फळाबागांचे क्षेत्र पाहून अतिरिक्त ४० शेततळे होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
या प्रामुख्याने ४४ बाय ४४, ४० बाय ४४, १४ बाय १४, २० बाय २० या आकारांचे हे तळे असणार आहे. १९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)