विभागीय आयुक्त सर, ओळखपत्र दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:02 AM2021-02-11T04:02:06+5:302021-02-11T04:02:06+5:30
सुनील केंद्रेकर यांनी घेतली लस : भिती न बाळगता लस घेण्याचे केले आवाहन औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी ...
सुनील केंद्रेकर यांनी घेतली लस : भिती न बाळगता लस घेण्याचे केले आवाहन
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरणासाठी इतरांप्रमाणे विभागीय आयुक्तांनाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी ओळखपत्राची मागणी केली. तसेच लस घेतल्यानंतर ते अर्धा तास निगराणीतही थांबले. अर्धा तास पूर्ण होण्यास ३ मिनिटे शिल्लक असताना ते रवाना होत हाेते. त्यावेळी थोड आणखी वेळ थांबा सर, ३ मिनिटे बाकी आहे, असे आरोग्य कर्मचारी म्हणाले. त्यानंतर अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर केंद्रेकर बाहेर पडले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी १२ वाजता सुनील केंद्रेकर दाखल झाले. लसीकरण कक्षात संगणकावर नोंद करणाऱ्या कर्मचार्यांनी त्यांना ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत ओळखपत्र नव्हते. मात्र, त्यांनी तात्काळ मोबाईलवरून आधार कार्ड दाखविले. त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर ते लसीकरण कक्षात दाखल झाले. यावेळी अधिपरिचारिका रेश्मा शेख यांनी केंद्रकर यांना लस दिली. त्यापूर्वी त्यांना ताप आहे का, काही अलर्जी आहे, अशीही विचारणा करण्यात आली. तेव्हा पेनिसिलिनची ॲलर्जी असल्याचे केंद्रेकर यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य वैद्यकीय डॉ. नीता पाडळकर, डॉ. महेश लड्डा, डॉ. संतोष नाईकवाडे, डॉ. भारती नागरे, डॉ. अर्चना राणे, अधिपरिचारिका कुसूम भालेराव आदी उपस्थित होते.
लोकांनी स्विकार करावा म्हणून आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. लोक रांगा लावून लस घेतली, असा विश्वास सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केला.
फोटो ओळ...
जिल्हा रुग्णालयात बुधवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य वैद्यकीय डॉ. नीता पाडळकर आदी उपस्थित होते.
व