दिव्यांगत्वाचा आघात संपूर्ण कुटुंबावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 12:02 AM2016-08-28T00:02:40+5:302016-08-28T00:19:12+5:30

अमोल तांदळे , चौसाळा मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई

Divyaagata trauma on the whole family | दिव्यांगत्वाचा आघात संपूर्ण कुटुंबावर

दिव्यांगत्वाचा आघात संपूर्ण कुटुंबावर

googlenewsNext

अमोल तांदळे , चौसाळा
मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई या दाम्पत्यासमोर पडला आहे. मुलगा एकनाथ जन्मत:च दिव्यांग असल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी या दाम्पत्यावरच आहे.
बीड तालुक्यातील चौसाळाजवळील ६० ते ७० उंबऱ्याचे गाव असलेल्या धोत्रा येथील दिव्यांग एकनाथची ही व्यथा आहे. २००५ दरम्यान संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग एकनाथला लाभ मिळावा यासाठी सीताबाई व रेवणनाथ यांनी बीड तहसीलकडे अर्ज केला होता. त्यानंतर अनेक वेळा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारले. मात्र, एकनाथला कवडीची मदत झाली नसल्याचे एकनाथची आई सीताबाई यांनी सांगितले.
रेवणनाथ व सीताबाई यांना तीन अपत्ये आहेत. एकनाथ हा सर्वांत मोठा, त्यानंतरच्या भारतने परिस्थितीअभावी शिक्षण सोडून दुकानावर कामास लागला. तर तिसरा बाळासाहेब शिक्षण घेत असतानाच शेतीकडे वळला आहे. दिव्यांग एकनाथला शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी अर्ज-विनंत्या करूनही कुठलाही लाभ त्यांना मिळाला नाही. आईला शेतात काम करण्याची इच्छा असूनही घरातील दिव्यांग एकनाथकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे तीही हतबल आहे. एकीकडे अपंग नसलेले अपंगाच्या सवलती लाटत आहेत, तर दुसरीकडे एकनाथसारख्या खरे लाभार्थी त्यापासून वंचित आहेत.

Web Title: Divyaagata trauma on the whole family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.