अकॅडमिक कॅलेंडरनुसार विद्यापीठ, महाविद्यालयांच्या दीपावली सुट्या जाहीर
By राम शिनगारे | Published: November 3, 2023 01:30 PM2023-11-03T13:30:55+5:302023-11-03T13:31:42+5:30
२८ नोव्हेंबर ते २ मे या काळात द्वितीय सत्र पार पडेल
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयांना ५ ते २७ नोव्हेंबर या काळात दीपावलीच्या सुट्या जाहीर केल्या आहेत, अशी माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली. त्यानुसार ६ ते २७ नोव्हेंबर दरम्यान दीपावलीच्या सुट्या असणार आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने २०२३-२४ हे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच अकॅडमिक कॅलेंडर’ जाहीर करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अंमलात आणला होता. त्यानुसार विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस, धाराशिव येथील उपपरिसर, घनसावंगी मॉडेल कॉलेज आणि चारही जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांसाठी हे वेळापत्रक लागू असणार आहे. या वेळापत्रकानुसार १५ जून ते ५ नोव्हेंबर दरम्यान प्रथम सत्र आहे, तर ६ ते २७ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सुट्या असणार आहेत. २८ नोव्हेंबर ते २ मे या काळात द्वितीय सत्र पार पडेल, तर ३ मे २०२४ पासून उन्हाळी सुट्या असतील असेही डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.