दिवाळीत पदोन्नतीचा बार; ६० अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती

By विकास राऊत | Published: November 11, 2023 02:43 PM2023-11-11T14:43:01+5:302023-11-11T14:43:07+5:30

सेवाज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत.

Diwali promotion bar; 60 top clerks, board officers promoted to Naib Tehsildar | दिवाळीत पदोन्नतीचा बार; ६० अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती

दिवाळीत पदोन्नतीचा बार; ६० अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती

छत्रपती संभाजीनगर : शासनाने दिवाळीच्या तोंडावरच पदोन्नतीचा बार उडविला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मराठवाड्यातील ६० अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. शुक्रवारी पदोन्नतीचा आदेश शासनाने जारी केला.

तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातून रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नतीमध्ये १७ खुल्या प्रवर्गातील, १३ व्हीजेएनटी, १० ओबीसी, अनुसूचित जाती सहा, अनुसूचित जमाती १४ जणांचा समावेश आहे.

सुनीता वैष्णव, के.के. कुलकर्णी, सोपान ठोंबरे, स्वप्ना अंभुरे, एन.एम. त्रिभुवन, व्ही.डब्ल्यू. भालेराव, संध्या सुकाळे, जी.व्ही. धारासूरकर, एस.एस. माजलगावकर, डी.जी. शिंदे, व्ही.डब्ल्यू. कांबळे, ए.एच. सरोदे, सतीश कुलकर्णी, एम.ए. सरवर, व्ही.यू. पुरी, ई.एल. भोजने, ए.जी. लबडे, धनसिंग गुंजाळे, पंढरीनाथ शिंदे, आर.एम. निहाळ, डी.एस. पेरके, गजानन इनामदार, एम.पी. गाडे, जी.एस. स्वामी, आर.बी. सराफ, डी.एम. खटावकर, डॉ. गणेश देसाई, डी.एन. पेंढारकर, एम.एम. महाजन, राहुल बनसोड, विलास साेनवणे, कृष्णा विसपुते, संतोष इथापे, तुकाराम बनकर, एस.एस. पाटील, पी.बी. कावरे, जालिंदर दोडके, कैलास जेठे, कृष्णा देशमुख, गोकुळ कोठुळे, पी.के. माढेकर, एम.एस. खंदारे, एम.एस. बडे, ए.एम. सुळे, एम.ए. क्षीरसागार, ए.आर. वंजारे, एस.बी. पाळवदे, नर्मदा उगलमुगले, डी.एम. घुगे, सुग्रीव मुंडे, विनोद पवार, एम.ए. मोईज, वसंत महाजन, विजय मोरे, सतीश रेड्डी, एस.ए. पठाण, बालाजी सोनटक्के, डी.डी. कुलकर्णी, ए.बी. कोठुळे यांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे.

Web Title: Diwali promotion bar; 60 top clerks, board officers promoted to Naib Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.