पेन्शनर्सची दिवाळीनंतरच होणार दिवाळी...

By Admin | Published: October 22, 2014 01:14 PM2014-10-22T13:14:51+5:302014-10-22T13:14:51+5:30

चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.

Diwali will be celebrated after Diwali ... | पेन्शनर्सची दिवाळीनंतरच होणार दिवाळी...

पेन्शनर्सची दिवाळीनंतरच होणार दिवाळी...

googlenewsNext
>अविनाश चमकुरे, नांदेड
 
दिवाळी सणासाठी चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. मात्रमहागाई भत्त्याची थकबाकी लवकरच मिळणार असल्याने जिल्ह्यातील १७ हजार पेन्शनर्सची खरी दिवाळी ही नंतरच साजरी होणार आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला विशेष महत्त्व आहे. सणानिमित्त चालू महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी मिळेल असा कयास होता. मात्र शासनदरबारी यावर निर्णय झाला नाही. शासकीय सेवेत सध्या कार्यरत अधिकार्‍यांना दिवाळीत वेतनाऐवजी फेस्टीव्हल अँडव्हान्स हा पर्याय उपलब्ध असतो. मात्र सेवानवृत्त कर्मचार्‍यांची आर्थिक मदार सर्वस्वी नवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. 
जिल्ह्यात १७ हजारावर सेवानवृत्त अधिकारी, कर्मचारी असून यांच्या वेतनपोटी दर महिन्याला २0 कोटी रुपये जिल्हा कोषागारामार्फत वितरीत होतात. नवृत्तीवेतन खातेधारकांच्या बँक खात्यावर दर महिन्याच्या ३0 तारखेला जमा होते. यावेळी दिवाळी २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत साजरी केली जाणार आहे. सणानिमित्त खरेदीसाठी नवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी दिले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतचे कोणतेही निर्देश शासनाकडून २१ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा कोषागारास प्राप्त झाले नसल्याची माहिती अप्पर कोषागार अधिकारी देवीदास टोंगे यांनी दिली.
त्यामुळे सेवानवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांना ही दिवाळी साधेपणाने साजरी करावी लागणार आहे. मात्र चालू महिन्याच्या सेवानवृत्ती वेतनासोबत जानेवारी ते एप्रिल-२0१४ या चार महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी खात्यात वर्ग होणार आहे. ९0 टक्क्यांऐवजी १00 टक्के महागाई भत्ता शासन नियमाप्रमाणे अनु™ोय राहील. अधिकची रक्कम खर्चासाठी मिळणार असल्याने सेवानवृत्त कर्मचारी दिवाळीनंतर दिवाळी साजरी करु शकतील. परंतु सध्या तरी, उसनवारी करुन त्यांना दिवाळी सणात गोंड तोंड करुन घ्यावे लागणार आहे. 

Web Title: Diwali will be celebrated after Diwali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.