मुलींना हुंडा नको, शिक्षण द्या-रजा मुराद
By Admin | Published: July 24, 2016 12:29 AM2016-07-24T00:29:17+5:302016-07-24T00:49:11+5:30
बीड : महिला शिकली तर घराची प्रगती होते, त्यासाठी मुलींना हुंडा देण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवा, असे आवाहन हिंदी चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी शनिवारी येथे केले.
बीड : महिला शिकली तर घराची प्रगती होते, त्यासाठी मुलींना हुंडा देण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवा, असे आवाहन हिंदी चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी शनिवारी येथे केले.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शहरातील नाळवंडी नाका येथील एका मंगल कार्यालयात आयोजित ईद- मिलाप कार्यक्रमात ते बोलत होते. आ. विनायक मेटे, उपअधीक्षक गणेश गावडे, शहर-ए-काझी मौलाना जफर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस दिलीप गोरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, अशोक लोढा, मदनराव चव्हाण, डॉ. रमेश पानसंबळ, मोईन मास्टर, शेरजमा पठाण, शेख अखिल, फारुक पटेल, खालेक पेंटर, जकी सौदागर, शेख निजाम, सुहास पाटील यांची उपस्थिती होती.
रजा मुराद म्हणाले, ईद- मिलाप कार्यक्रमातून सर्वधर्मिय ऐक्य जोपासले जाते. अशा कार्यक्रमाची गरज आहे. यावेळी आ. मेटे यांच्यासह इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. शिरखुर्मा, फराळाचा उपस्थितांनी लाभ घेतला. हिंदू- मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)