हाता-पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष करू नका, पडू शकते महागात

By संतोष हिरेमठ | Published: November 18, 2023 07:08 PM2023-11-18T19:08:39+5:302023-11-18T19:09:39+5:30

हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Do not ignore if you have frequent tingling in hands and feet, it can be expensive | हाता-पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष करू नका, पडू शकते महागात

हाता-पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष करू नका, पडू शकते महागात

छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यात थंडी वाढल्याने हाता - पायांना मुंग्या येणे, ही सामान्य बाब आहे. मात्र, हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे वारंवार घडत असल्यास शरीरातील इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. इतर अनेक अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे तातडीने उपचार घ्यायला हवेत. हाता - पायांना वारंवार मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या
शरीरासाठी अतिशय आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी १२ आणि ‘व्हिटॅमिन ई’ची कमतरता हाता - पायाला येणाऱ्या मुंग्यांचे कारण ठरू शकते. हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुंग्या येण्याचे प्रमुख कारण समजून घ्यावे.

‘व्हिटॅमिन बी१२’च्या कमतरतेमुळे अनेक समस्या
‘व्हिटॅमिन बी१२’ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, न्युरोलॉजिकल समस्या उद्भवू शकते. तसेच त्वचा पिवळी पडणे, वजन कमी होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे, असाही त्रास होऊ शकतो. या जीवनसत्त्वाची सतत कमतरता राहिल्यास डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, तोंडाला फोड येणे, अशाही समस्या उद्भवू शकतात.

आहारात काय घ्याल?
जीवनसत्व बी १२ मिळवण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यामध्ये मोड आलेल्या मेथीची उसळ कोथिंबीर खावी. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारात करावा. ‘जीवनसत्व ई’साठी सूर्यफुलांच्या तेलासोबत ऑलिव्ह ऑइलचा समावेश करावा.

रक्तपेशी,चेतासंस्थेसाठी महत्वपूर्ण
जीवनसत्व बी १२ हे शरीरातील रक्तपेशी, चेतासंस्था यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनसत्व बी १२ प्रतिदिवशी एका व्यक्तिला २.४ मायक्रो ग्रॅम आवश्यक आहे. जीवनसत्व ब, जीवनसत्व ई सोबत आहारामध्ये काही खनिजांचा देखील वापर करावा. यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस असणारे अन्नघटक आहारात घ्यावे.
- अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

Web Title: Do not ignore if you have frequent tingling in hands and feet, it can be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.