पावसाचे पाणी आमच्या शेतात सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:08 PM2019-07-02T23:08:32+5:302019-07-02T23:09:01+5:30
औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध ...
औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध दिशेला शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येत आहे. या प्रक्रियेला शेतकºयांनी मंगळवारी कडाडून विरोध दर्शविला. अगोदरच आमच्या जमिनी घेऊन राष्टÑीय महामार्ग करण्यात येत आहे. उर्वरित जमिनीत पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल, राष्टÑीय महामार्ग अधिकाºयांनी यात मार्ग काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अब्दुल वाहब अब्दुल बारी कुरैशी, रफिया बेगम यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, भालगाव येथील गट नं. ३५० मधील ११०० चौरस मीटर क्षेत्र राष्टÑीय महामार्गासाठी २०१६ मध्ये घेण्यात आले. या जागेचा अर्धाच मोबदला मिळाला आहे. उर्वरित मोबदल्यासाठी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे या भागातील शेतकºयांना झिजवावे लागत आहेत. त्यातच रस्त्याचे काम करणाºया अधिकारी व कंत्राटदारांनी विरुद्ध बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी आमच्या शेतासमोर आणून सोडण्याचा निर्णय घेतला. मोठ-मोठे पाईप टाकून काम सुरू केले. सुरुवातीला शेतासमोर मोठी सिमेंटची नाली बांधून पाणी वाहून नेण्यात येईल, असे शेतकºयांना सांगितले. आता थेट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यावर पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल. या कामामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.