जिल्ह्यातील डेंग्यू साथीबाबत हलगर्जीपणा करू नका-जोंधळे
By Admin | Published: August 26, 2016 12:18 AM2016-08-26T00:18:13+5:302016-08-26T00:38:54+5:30
जालना : डेंग्यूच्या साथीबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. गुरूवारी जोंधळे यांनी डेंग्यू साथीबाबतचा आढावा घेतला.
जालना : डेंग्यूच्या साथीबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. गुरूवारी जोंधळे यांनी डेंग्यू साथीबाबतचा आढावा घेतला.
जिल्ह्यात डेंग्यू तापेने थैमान घातले आहे. त्यात ५ जणांना डेंग्यूची लागन झाली असून त्यापैकी दोन युवतीचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन संशयित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याने याची दखल घेवून गुरुवारी या संदर्भात जिल्ह्याधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी डेंग्यूसंदर्भात जिल्ह्यात काय उपाययोजना करण्यात येत आहे. याची विचारणा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.
जालना तालुक्यातील सेवली काकडा, बदनापूर तालुक्यातील मांडवा, भोकरदन तालुक्यातील पारध, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव, घनसावंगी तालुक्यातील मूर्ती, आणि अंबड तालुक्यातील एकनाथ नगर येथे डेंग्यू सदृश्य तापेचे रुग्ण आढळून आल्याने या संदर्भात लोकमतने दोन दिवस सविस्तर वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जि.प. आरोग्य अधिकारी अमाले गिते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून डेंग्यूच्या तापावर जिल्ह्यात काय काय उपाययोजना करण्यात येत आहेत याचा आढावा घेतला. आरोग्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करू नका अशा सूचना जोंधळे यांनी दिल्या आहे.
जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्याने तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याची खबददारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी जिल्ह्यातील ४० प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रावरील कर्मचाऱ्यांना तापेसंदर्भात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
जि.प. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या उपायोजनेवर संबधीत तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करण्याची गरज आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा आरोग्य अधिकारी गिते यांनी दिले आहेत.