गायब झालेल्या ‘हायवा’चा शोध लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 08:57 PM2018-11-13T20:57:51+5:302018-11-13T21:02:08+5:30
वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्याप शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहेत. चोरी गेलेला हायवा परत मिळावा,यासाठी महसूल विभागाने दिलेले पत्र घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यातून आठ दिवसांपूर्वी गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्याप शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहेत. चोरी गेलेला हायवा परत मिळावा,यासाठी महसूल विभागाने दिलेले पत्र घेण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
वाळूज परिसरातील अनधिकृतपणे सुरु असलेल्या वाळू पटट््यावर आठवडाभरापूर्वी महसूल विभागाने छापे टाकले होते. कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०, ई.जी.६७१८) महसूलच्या पथकाने पकडला होता. गंगापूरचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांनी चालक इक्बाल शेख व मालक दीपक वाघमोडे यांच्या नावासह हायवा वाळूज पोलिसांच्या स्वाधीन करत ताबा पावती घेतली होती. वाळूज पोलिसांच्या ताब्यात असताना हा हायवा ठाण्यातून गायब झाला.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पोलिस ठाण्यातील ठाणे अमंलदाराने ठाणे प्रमुखांच्या तोंडी आदेशानुसार हा हायवा ‘लक्ष्मीपुजना’च्या नावाखाली संबधित वाळूमाफियाच्या स्वाधीन केला होता. दरम्यान, दिवाळीचे लक्ष्मीपूजन होऊनही हायवा परत न आल्यामुळे या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती. या प्रकरणाची कुणकुण लागताच वाळूज पोलीस ठाण्यातून हायवा चोरीला गेल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. आता हायवा गायब होऊन आठवडा उलटला तरी हायवाचा शोध लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. महसूल विभागाच्या पत्रामुळे पोलीस प्रशासनाची पंचाईत झाली आहे.
महसूलचे पत्र घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
वाळूज पोलीस ठाण्यातून हायवा गायब झाल्याने महसूल विभागही चक्रावून गेला आहे. वाळूसह हायवा चोरी गेल्यामुळे तो पुुन्हा जप्त करुन पुढील आदेशापर्यंत पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवावा, अशा आशयाचे पत्र घेऊन महसूल विभागाचे अधिकारी दोन दिवसांपासून वाळूज पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र पोलीस निरीक्षक ठाण्यात आल्याशिवाय पत्र स्विकारणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने महसूल विभागाचे अधिकारी पत्र घेऊन माघारी गेले आहे. या विषयी तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाळूज पोलिसांकडून पत्र घेण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.