‘कामे गतीने करा’
By Admin | Published: October 1, 2016 12:47 AM2016-10-01T00:47:53+5:302016-10-01T01:22:49+5:30
बीड : सामान्यांची कुठलीही कामे प्रलंबित राहता कामा नये. कामांमध्ये अडचणी असतील तर तसे संबंधितांना कळवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल
बीड : सामान्यांची कुठलीही कामे प्रलंबित राहता कामा नये. कामांमध्ये अडचणी असतील तर तसे संबंधितांना कळवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आ. लक्ष्मण पवार, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे या भागात नुकसान झाले आहे तेथे पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. सर्व स्तरातील अहवाल ३ आॅक्टोबरपर्यंत प्राप्त होणार आहेत. त्यानंतर नुकसान भरपाईच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणातील पाणीसाठा, पीक परिस्थिती व नुकसान भरपाई संबंधीच्या माहितीचे सादरीकरण केले.
आ. धोंडे, पवार, देशमुख यांनी विकासाचे विविध मुद्दे उपस्थित केले. रस्ते, पुलांची दुरस्ती हे विषय सर्वाधिक तीव्रतेने उपस्थित झाले. पावसामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचना आमदारांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम, महावितरण व सिंचनांची प्रलंबित कामे हे मुद्देही चर्चेत आले. शिवाय, अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याच्या दृष्टीने उपाय करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)