कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:02 AM2021-07-31T04:02:11+5:302021-07-31T04:02:11+5:30
योगेश पायघन औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा ...
योगेश पायघन
औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा काढल्यानंतर आलेल्या वाईट अनुभवांमुळे पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याने जिल्ह्यात २०१८ मध्ये ६.३६ लाख, २०१९ मध्ये १०.७६ लाख, २०२० मध्ये ८.२४ लाख तर २०२१ मध्ये मुदतवाढ मिळूनही केवळ ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.
---
यंदा केवळ ३५ टक्के पिकांचा विमा
---
-जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७० हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरवर (९५.७१ टक्के) शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत.
-जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरपैकी २ लाख ३१ हजार ७०५ हेक्टरवरील पीक लागवडीचा विमा उतरविला आहे.
-गेल्या वर्षी पीकविम्याचा अत्यल्प लाभ मिळाल्याने एकूण खरीप पेरणीपैकी केवळ ३५ टक्के पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला आहे.
--
विम्याचे प्रमाण घटण्याची कारणे अनेक
--
विमा भरण्याच्या अंतिम तारखेवेळी चांगला पाऊस-पाणी, पीकपरिस्थिती चांगली होती, तसेच गेल्यावेळी विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्याच्या आलेल्या अनुभवातून नाराज शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवली. तर, सातबारा आणि विमा पोर्टल लिंक झाल्याने डुप्लिकेशन पण थांबल्याने यावर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
-डाॅ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक, औरंगाबाद
---
जिल्ह्यातील एकूण शेतकरी
५,८५,७६५
---
पीकविमा काढलेले शेतकरी
--
गतवर्षी - ८,३०,७४८
यावर्षी -५,४१,५०४
---
६,७५,१७० हेक्टर सरासरी खरीप क्षेत्र
६,४६,२१३ हेक्टर एकूण खरीप पेरणी
--
पीक - प्रत्यक्ष पेरणी
कापूस - ३,५३,३९९
मका - १,६९,०५०
सोयाबीन - २६,७०३
बाजरी - २२,८७५
तूर - ४१,४०५
उडीद - ४,२०१
मूग - १३,५८०
भुईमूग - ६,१८५
ज्वारी - ४६०
----
गतवर्षीचा अनुभव वाईट....
--
गेल्यावेळी विमा काढून नुकसान झाल्यावर वेगवेगळी तांत्रिक कारणे दाखवून विमा नाकारल्या गेला. दरवेळी काहीतरी कारणे दाखवून विमा संरक्षक असताना विम्याचा लाभ मिळत नाही, मग विमा काढून काय उपयोग? त्यामुळे यावर्षी विमा काढला नाही. सध्यातरी पीकपरिस्थिती चांगली आहे. शेवटी शेतकऱ्यांचे नशीबच असते.
-कैलास पंडित, शेतकरी
---
पीक, फळपीक विमा भरूनही त्याचा लाभ गरज पडते तेव्हा मिळत नाही. निसर्गाचा कोप झाल्यावर विम्याची मदत मिळण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षित तुटपुंजी मदतही मिळत नाही. अनेकदा तक्रारी करून थातूरमातूर उत्तरे विमा कंपन्या देतात. दरवेळी विमालाभाची रक्कम कमी आणि त्यासाठी कागदोपत्री खर्चच अधिक होतो. त्यात विमा भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गेल्यावेळी नुकसान होऊन हाती काहीच आले नाही.
-प्रकाश आगे, शेतकरी