ओळखीच्या विधवेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

By | Published: December 4, 2020 04:05 AM2020-12-04T04:05:08+5:302020-12-04T04:05:08+5:30

डॉ. प्रदीप काशीनाथ जाईबहार (रा. श्रीनिकेतन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडितेच्या पतीचे ७ वर्षांपूर्वी ...

Doctor arrested for sexually abusing widow | ओळखीच्या विधवेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

ओळखीच्या विधवेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

googlenewsNext

डॉ. प्रदीप काशीनाथ जाईबहार (रा. श्रीनिकेतन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडितेच्या पतीचे ७ वर्षांपूर्वी निधन झाले. तो तिच्या ओळखीचा असल्यामुळे घरातील लहान-मोठ्या कामासाठी ती त्याची मदत घेत असे. २०१५ मध्ये रात्री पीडितेची मुले मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर गेली होती. ती घरी एकटी असल्याची संधी साधून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या जाईबहारने तिच्यावर प्रथम बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर बदनामी करीन अशी धमकी देऊन तो निघून गेला. यानंतर सलग ५ वर्षांपासून तो तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत होता. दरम्यान, त्याने पीडितेच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यामुळे तिने २ डिसेंबर रोजी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरा तिची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जी. पी. सोनटक्के यांनी अवघ्या काही तासांत आरोपी प्रदीपला बेड्या ठोकल्या.

चौकट

लाच घेतानाही पकडला होता आरोपी

आरोपी डॉ. प्रदीप जाईबहार याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. यामुळे सुमारे वर्षभर तो निलंबित होता. निलंबन रद्द करून तो जिल्हा परिषदेते पुन्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाला होता. आता पुन्हा त्याला बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यामुळे पुन्हा त्याला निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Doctor arrested for sexually abusing widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.