औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:12 AM2018-01-05T01:12:20+5:302018-01-05T10:45:48+5:30

औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्रे मनपाचे कर्मचारी खुलताबाद शहर परिसरात आणून सोडत असल्याने खुलताबादेत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.

 The dogs of Aurangabad are in Khulatabad city | औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्रे मनपाचे कर्मचारी खुलताबाद शहर परिसरात आणून सोडत असल्याने खुलताबादेत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून औरंगाबाद मनपाने कुत्रे खुलताबाद परिसरात सोडू नये तसेच कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्याची मागणी खुलताबादचे नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर यांनी केली आहे.

खुलताबाद शहर परिसरातील सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील धर्मा तलाव व खुलताबाद घाट परिसरात औरंगाबाद मनपा हद्दीतील पकडलेले मोकाट कुत्रे मनपा कर्मचारी आणून सोडतात. यामुळे खुलताबादेत कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.
सदरील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी औरंगाबाद मनपाने डॉग व्हॅन उपलब्ध करून देण्याची मागणी गुरूवारी खुलताबादचे नगराध्यक्ष अ‍ॅड. एस.एम. कमर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन, गटनेता जुबेर लाला, अशपाक कुरेशी, भाऊसाहेब जगताप यांनी महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

Web Title:  The dogs of Aurangabad are in Khulatabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.