३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 08:08 PM2022-10-17T20:08:03+5:302022-10-17T20:08:16+5:30
१० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे
सिल्लोड (औरंगाबाद): जलजीवन मिशन अंतर्गत 'हरघर जल, हरघर नल' हे उद्धिष्ट समोर ठेऊन राज्यातील ३४ हजार गावांना पाणी देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यातील ३० हजार गावांचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून २२ हजार गावांची वर्क ऑर्डर निघाली आहे. तर १० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
आज दुपारी सिल्लोड तालुक्यातील पांगरी, केळगाव, चारनेर येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील पुढे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याला २७६९ कोटी रुपये तर सिल्लोड तालुक्याला जलजीवन पाणी पुरवठा योजने अंतर्गत एक हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेला ४०० कोटी रुपये पाण्याची टाकी बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे.
नेतृत्व कमजोर होते म्हणून...
नेतृत्व कमजोर होते म्हणून ५५ पैकी ४० आमदार गेले. त्यात आठ मंत्री होते आम्ही राजकारणाचा सट्टा खेळला. गद्दार म्हणाऱ्यांना आता कामातून उत्तर देऊ, असेही मंत्री पाटील यांनी ठणकावून सांगितले.