आॅईल अभावी डीपींचा रोग गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:00 AM2017-11-16T00:00:42+5:302017-11-16T00:00:46+5:30
महावितरणकडे जळालेल्या डीपी येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तर आॅईल मिळत नसल्याने दुरुस्तीचीही कामे होत नसल्याने शेतकरी आता पुन्हा आक्रमक होत चालले आहेत. एकीकडे वीजबिल वसुली व दुसरीकडे डीपींचा ताण अशा दुहेरी पेचात अधिकारी सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणकडे जळालेल्या डीपी येण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तर आॅईल मिळत नसल्याने दुरुस्तीचीही कामे होत नसल्याने शेतकरी आता पुन्हा आक्रमक होत चालले आहेत. एकीकडे वीजबिल वसुली व दुसरीकडे डीपींचा ताण अशा दुहेरी पेचात अधिकारी सापडले आहेत.
महावितरणकडून डीपी दुरुस्तीसाठी आॅईल मिळत नसल्याने अधिकाºयांची अडचण होत आहे. ही समस्या सुटत नसल्याने जवळपास १00 डीपी दुरुस्तीसाठी पडून आहेत. २६ केएल एवढ्या आॅईलची मागणी असताना काही दिवसांपूर्वी ५ केएल आॅईल मिळाले होते. त्यात काही डीपींचीच दुरुस्ती करणे शक्य झाले. यामुळे आज अनेक गावातील शेतकºयांनी हिंगोलीत हजेरी लावल्याचे चित्र होते. तर कार्यालयही गजबजले होते. तीच ती उत्तरे देताना अधिकारी मात्र हैराण होत असल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे येथील अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव निलंबित झाल्यानंतर नांदेडचे सुधाकर जाधव यांना पदभार दिला. ते इकडे फिरकतही नाहीत.