न्यायालयीन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणारे एकमेव विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:39 PM2022-04-12T18:39:05+5:302022-04-12T18:40:35+5:30

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयास भेट दिली तेव्हा उर्दू भाषेतून नायालयीन कामकाज होत होते.

Dr. Babasaheb Ambedkar is the only law minister to directly inspect the court proceedings in Aurangabad | न्यायालयीन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणारे एकमेव विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर

न्यायालयीन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणारे एकमेव विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर

googlenewsNext

- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  भारत सरकारचे पहिले विधिमंत्री असताना त्यांनी १९४९-५० साली औरंगाबाद येथील जिल्हा न्यायालयास भेट देऊन येथील न्यायालयीन कामकाजाचे प्रत्यक्ष अवलोकन केले होते. (Dr. Babasaheb Ambedkar in Aurangabad ) 

त्यांच्या या भेटीवेळी येथे कार्यरत असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर गोडसे आणी वकील संघाने डॉ. आंबेडकर यांचे स्वागत करून न्यायालयीन कामकाज ऊर्दू भाषेतून होत असल्याचे त्यांना दाखवून दिले होते. न्यायदान कक्षात बसून एका खटल्याच्या सुनावणीचे अवलोकनही डॉ. आंबेडकर यांनी केले होते. बाबासाहेबांनी वकिलांना हितोपदेश करताना ‘वकिलीबरोबर नैतिकता सांभाळली पाहिजे. न्यायालयीन कामकाज करताना गरिबाच्या आर्थिक व सामाजिक स्तराचा विचार करून त्यांच्याकडून कमीत कमी शुल्क आकारले पाहिजे’, असे आवाहन केले होते.

या भेटीच्या वेळी प्रामुख्याने ॲड. सरदार दिलीपसिंग, ॲड. द्वारकादास पटेल, ॲड. काझी गुलाम कादर, ॲड. काशीनाथ नावंदर, ॲड. रामराव महाजन, ॲड. व्ही.जी. गंगापूरवाला, ॲड. लक्ष्मीचंद जैन, ॲड. एच. जी. वैष्णव, ॲड. आर. जी. भादेकर, ॲड. आर. आर. जेथलिया, ॲड. एस. एल. नेवासेकर, ॲड. रहेमत अली नेहरी, ॲड. जहागीरदार, ॲड. सत्यपाल लोहिया,ॲड. लक्षमणराव कुलकर्णी, ॲड. सुधाकर देशमुख, ॲड. दत्तोपंत देशपांडे, ॲड. पी. आर. देशमुख, ॲड. हणमंतराव जोशी आदी विधिज्ञ उपस्थित होते.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar is the only law minister to directly inspect the court proceedings in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.