डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:28 PM2019-02-28T23:28:20+5:302019-02-28T23:28:56+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालकपदाचा ‘खो-खो’चा खेळ गुरुवारीही (दि.२८) सुरूच होता. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. मात्र, डॉ. दिगंबर नेटके यांनी सायंकाळी उशिरापर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. ते शुक्रवारी (दि.१) पदभार घेण्याची शक्यता आहे.

Dr. Examination Department of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग वाऱ्यावर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग वाऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देजयश्री सूर्यवंशी यांनी पदभार सोडला : दिगंबर नेटके आज पदभार घेण्याची शक्यता


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालकपदाचा ‘खो-खो’चा खेळ गुरुवारीही (दि.२८) सुरूच होता. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. मात्र, डॉ. दिगंबर नेटके यांनी सायंकाळी उशिरापर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. ते शुक्रवारी (दि.१) पदभार घेण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी सहा महिन्यांपूर्वी डॉ. साधना पांडे यांच्याकडून डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला होता. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात तत्कालीन प्रभारी परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा पदभार काढला. हा पदभार घेण्यास विद्यापीठातील एकही प्राध्यापक पुढे येत नसल्यामुळे तात्पुरता पदभार डॉ. पांडे यांच्याकडे देण्यात आला. शेवटी डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याकडे पदभार देण्यात आला. सुरुवातीचे दोन-तीन महिने त्यांना परीक्षा विभागातील खाच-खळगे समजून घेण्यातच गेले. एका परीक्षेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू असतानाच त्यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढण्यात आला. याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. कुलगुरूंनी डॉ. सूर्यवंशी यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतरच पदभार सोडणार अशी भूमिका घेतली. कुलगुरू दौºयावरून परतण्यास दोन दिवस लागणार असल्यामुळे मी मेलद्वारेच पदभार सोडत असल्याचे कळवून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. कुलगुरूंनी दिलेली वागणूक अवमानकारक आहे. महिला दिनाची ही दिलेली भेट असल्याची कडक टीकाही त्यांनी पदभार सोडताना केली. पदभार घेण्यास कोणीही तयार नसताना माझ्या माथी मारले आणि पाठीशी उभे राहण्याऐवजी सोयीनुसार पदभार काढून घेतला. हा त्यांचा अधिकार असला तरी किमान सांगायला तरी पाहिजे होते. अनेक वेळा मोबाईल केला, त्यासही तीन दिवसांत कुलगुरूंनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे पदमुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नेटके तिसऱ्यांदा होणार प्रभारी संचालक
परीक्षा विभागाच्या प्रभारी परीक्षा संचालकपदाचा पदभार डॉ. दिगंबर नेटके तिसºयांदा स्वीकारणार आहेत. साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने परीक्षेत केलेल्या गैरप्रकारामुळे डॉ. नेटके यांना पहिल्यांदा पद सोडावे लागले. यानंतर पुन्हा त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटल्याप्रकरणी त्यांच्याकडून दुसºयांदा पदभार काढून घेतला. तरीही तिसºयांदा पदभार घेण्यास डॉ. नेटके तयार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षा संचालकपदाच्या मुलाखतीमध्ये डॉ. नेटके यांना कुलगुरूंनी अपात्र ठरविलेले आहे.

Web Title: Dr. Examination Department of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.