पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:40 AM2018-03-27T07:40:30+5:302018-03-27T07:56:26+5:30

एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे मंगळवारी (27 मार्च) निधन झाले आहे.

Dr. Gangadhar Pantawane passes away at age of 80 | पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंचे निधन 

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंचे निधन 

googlenewsNext

औरंगाबाद - एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे मंगळवारी (27 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

रात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास  पानतावणे यांनी औरंगाबाद येथील मणिक हॉस्पिटमध्ये अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 2018 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पुरस्कार स्वीकारता आला नाही.

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे भूषविलं अध्यक्षपद

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी 2009 साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.

अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते. 

गंगाधर पानतावणे यांच्याबाबतची माहिती

गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मूळचे विदर्भातले. 28 जून 1937 साली नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. 1956 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं.

Web Title: Dr. Gangadhar Pantawane passes away at age of 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.