डॉ. नागनाथ कोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:23 PM2017-08-14T18:23:17+5:302017-08-14T18:23:23+5:30

सिडको विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  डॉ. नागनाथ कोडे यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. 

Dr. Nagnath Kode announces the President's Police Medal |  डॉ. नागनाथ कोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

 डॉ. नागनाथ कोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १४  :  सिडको विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  डॉ. नागनाथ कोडे यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. 

डॉ. नागनाथ कोडे यांची १९८७ साली पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाली. त्यांनी उस्मानाबाद, बीड, नांदेड व औरंगाबाद या ठिकाणी सेवा बजावली आहे. नांदेडला पोलीस निरीक्षक पदी असताना त्यांनी एलएलबी , एमबीए या पदव्या प्राप्त केल्या. तसेच त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कायदा या विद्या शाखेत पीएचडी प्रदान केली आहे. या सोबतच त्यांनी " प्रेमाचे फुल आणि एकच मुल" हे तीन अंकी नाटकही लिहिले आहे. सध्या ते छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  म्हणून कार्यरत आहेत. में- २०१७ मध्ये त्यांना विशेष कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. 

यासोबतच भारत बटालियनचे समादेशक निसार तांबोळी यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे. 

Web Title: Dr. Nagnath Kode announces the President's Police Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.