डॉ. राजन शिंदे खून प्रकरण : पाच दिवसांनंतरही खुनाचा उलगडा होईना; दोन संशयितांची तब्बल ६ तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 10:53 AM2021-10-16T10:53:56+5:302021-10-16T11:02:19+5:30

Dr. Rajan Shinde murder case: खुनाची घटना घडली त्या रात्री डॉ. राजन शिंदे यांची गाडी ज्या ज्या मार्गावर फिरली त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात येत आहेत.

Dr. Rajan Shinde murder case: Murder not solved even after five days; 6 hours interrogation of two suspects | डॉ. राजन शिंदे खून प्रकरण : पाच दिवसांनंतरही खुनाचा उलगडा होईना; दोन संशयितांची तब्बल ६ तास चौकशी

डॉ. राजन शिंदे खून प्रकरण : पाच दिवसांनंतरही खुनाचा उलगडा होईना; दोन संशयितांची तब्बल ६ तास चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांना अनेक नवीन माहिती जमा करण्यात यश आल्याची माहिती घराशेजारील विहिरीतील गाळ काढण्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात

औरंगाबाद : डॉ. राजन शिंदे यांच्या खून प्रकरणाचा ( Dr. Rajan Shinde murder case ) पाचव्या दिवसांनंतरही उलगडा झालेला नाही. शुक्रवारी दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन संशयितांची तब्बल सहा तास चौकशी केली. या चौकशीतून पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (  Dr. Rajan Shinde Murder not solved even after five days) 

डॉ. शिंदे यांचा पाच दिवसांपूर्वी राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास लावण्यासाठी शहर पोलीस जंगजंग पछाडत आहेत. अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचता येत नसल्यामुळे पोलिसांनी इतर पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले आहे. खुनाची घटना घडली त्या रात्री डॉ. शिंदे यांची गाडी ज्या ज्या मार्गावर फिरली त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात येत आहेत. हे काम शुक्रवारीही सुरूच होते. आगामी काळात हे फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संबंधितांच्या सर्व्हरमधून सीसीटीव्हीचा डाटा डिलीट होण्यापूर्वी ते जमा करण्याची काळजी घेण्यात येत आहे. विविध मार्गावर शस्त्रे, कापडे शोधण्यात दोन पथके व्यस्त होती. डॉ. शिंदे यांच्या घराशेजारील विहिरीतील गाळ काढण्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेचे कर्मचारी आले नसल्यामुळे गाळ काढण्यास सुरुवात झाली नाही. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दोन संशयितांची वेगवेगळ्या ॲंगलने तब्बल सहा तास चौकशी केली. त्यातूनही ठोस कोणताही निष्कर्ष निघाला नाही.

तीन डीसीपी, चार पीआयसह इतर फाैजफाटा
डॉ. शिंदे यांच्या खुनाचा उलगडा करणे शहर पोलिसांसमोर आव्हानात्मक बनले आहे. शुक्रवारी शहरातील तीन पोलीस उपायुक्त चौकशीसाठी मैदानात उतरले होते. याशिवाय गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह मुकुंदवाडी, उस्मानपुरा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपासाची एक बाजू सांभाळली. सातारा, मुकुंदवाडी, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचेही विविध पथके तैनात केली आहेत. या खुनाच्या तपासासाठी १०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कार्यरत आहेत.

शुक्रवारी दहा तास काम
या घटनेच्या तपासात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आश्वासक कामे करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या पथकांनी १० तासांपेक्षा अधिक काम केले. मात्र, त्यातून ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याएवढे पुरावे मिळालेले नाहीत. तपास सुरूच आहे.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

हेही वाचा : 
- डॉ. राजन शिंदे खुन प्रकरण : चौथा दिवसही पुराव्याविनाच; झुंबडा, उस्मानाबाद येथून पथक परतले
- पत्नीच्या जबाबात विसंगती; डॉ. राजन शिंदे खुन प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ उस्मानाबादेत

Web Title: Dr. Rajan Shinde murder case: Murder not solved even after five days; 6 hours interrogation of two suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.