आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख लोककला अभ्यासक अचलखांब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:52 AM2017-10-26T05:52:34+5:302017-10-26T05:52:40+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रुस्तुम रंभाजी अचलखांब यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

Dr.Achalkhmbh, a renowned Folk Artist of the Department of Naturology, Ambedkar Marathwada University | आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख लोककला अभ्यासक अचलखांब यांचे निधन

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख लोककला अभ्यासक अचलखांब यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रुस्तुम रंभाजी अचलखांब यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
डॉ. अचलखांब यांनी आधुनिक मराठी रंगभूमी आणि लोकरंगभूमीवरील एक प्रतिभावंत नट, सिद्धहस्त लेखक म्हणून आपला ठसा उमटविला होता. लोकसाहित्य, नाट्यवाङ्मय, पाश्चिमात्य आणि पौर्वात्य रंगभूमीचे अभ्यासक तसेच कुशल दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय राहिली. त्यांनी सादर केलेले ‘संगीत मनमोहना’ खूपच गाजले होते.
अचलखांब आणि दिवंगत शाहीर विश्वास साळुंके या जोडगोळीने ही कलाकृती अजरामर करून ठेवली.
पल्लेदार आवाजाची देणगी
डॉ. अचलखांब यांना पल्लेदार आवाजाची देगणी लाभलेली होती. त्यांचा ‘अंधेरनगरी’मधील चनेवाला आबालवृद्धांना वेड लावणार ठरला. ‘अंधायुग’मधील गुंगा सैनिक अंगावर शहारे आणायचा.
डॉ. अचलखांब
यांची ग्रंथसंपदा
आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग
रंगबाजी
मराठी रंगभूमीचे प्रारंभपर्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथलेखन : एक आकलन
तमाशा रंगभूमी
कैफियत
अभिनयशास्त्र
लोकनायक श्रीकृष्ण (आगामी)
भारतीय पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी

Web Title: Dr.Achalkhmbh, a renowned Folk Artist of the Department of Naturology, Ambedkar Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू