सिडको वाळूज महानगरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:02 AM2021-09-23T04:02:16+5:302021-09-23T04:02:16+5:30
: दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात लगतच्या सोसायटीचे ...
: दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
: दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात लगतच्या सोसायटीचे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील म्हाडा कॉलनीसह इतर सोसायटीतील ड्रेनेजचे पाणी गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर वाहत आहे. ड्रेनेज चेंबर ओव्हर फ्लो झाले असून घाणपाणी मुख्य रस्त्यावर तसेच लगतच्या कल्याणी सिटी, बत्रा रेसिडेन्सी आदी नागरी वसाहतीत साचले आहे. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबूनच ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील बिल्डरांनी तसेच रहिवाशांनी सिडको प्रशासनाची परवानगी न घेता ड्रेनेजलाईनमध्ये सांडपाणी सोडले आहे. यामुळे ड्रेनेजलाईनचे चेंबर ओव्हर फ्लो झाले आहे. या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे वराह तसेच मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, यासाठी दत्तात्रय वर्पे, शिवाजी सातपल्ले, प्रदीप आणेवार, दादासाहेब कानडे, भूषण धनपाल, अंकुश एखंडे, दत्तात्रय येवले, कौस्तुभ कुलकर्णी, गणेश जाधव, पोपटराव सोनवणे, अमोल पवार, प्रसाद कुलकर्णी आदींनी सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, सिडकोचे अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.
फोटो ओळ- सिडको वाळूजमहानगर परिसरात ड्रेनेजलाईनचे चेंबर ओव्हर फ्लो झाल्याने घाणपाणी असे रस्त्यावरून वाहत आहे.
--------------