नांदेडात ६ नोव्हेंबरपासून नाट्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:21 AM2017-10-30T00:21:42+5:302017-10-30T00:21:48+5:30
महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालयच्या वतीने ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडणार असून ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेडसह परभणी, बीड या जिल्ह्यातील संस्थांचे १७ नाटके सादर होणार आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालयच्या वतीने ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडणार असून ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेडसह परभणी, बीड या जिल्ह्यातील संस्थांचे १७ नाटके सादर होणार आहेत़
या स्पर्धेला ६ नोव्हेंबरी रोजी अंबाजोगाई येथील संजय पवार लिखित व महेश सबनीस दिग्दर्शित कोण म्हणत टक्का दिला या नाटकाने प्रारंभ होणार आहे़ ७ नोव्हेंबर रोजी तन्मय ग्रुपचे नाथा चितळे लिखित सॉरी लाईन इज बिझी हे नाटक सादर होणार आहे़ ८ नोव्हेंबर रोजी शुभंकरोती फाऊंडेशन, नांदेडचे सुहास देशपांडे लिखित अस्तित्व अॅड अंश डॉट कॉम, ९ रोजी परळी येथील देवेंद्र बेलणकर लिखित ते दोन दिवस, १० रोजी परभणी जिल्ह्यातील शिवसह्याद्री प्रतिष्ठाण पोखर्णीचे रविंद्र कातनेश्वरकर लिखित आॅदर्स, ११ रोजी सतीश आळेकर लिखित महानिर्वाण, १२ रोजी परभणीचे रविशंकर झिंगरे लिखित एका तळ्यात होती, १३ रोजी सांस्कृतीक मंच नांदेडचे डॉ़ आनंद नाडकर्णी लिखित त्या तिघांची गोष्ट, १४ रोजी अजित दळवी लिखित डॉक्टर तुम्ही सुद्धा, १५ रोजी सुहास देशपांडे लिखित नांदेडचे पुन्हा कोठी हमीदाबाईची, १६ रोजी अंबाजोगाई येथील महेंद्र सुके लिखित कु़ सौ़ कांबळे, १७ रोजी परभणी येथील रामदास कदम लिखित एक जांभूळ आख्यान, १८ रोजी अंबाजोगाई येथील सई परांजपे लिखित माझा खेळ मांडू दे, १९ रोजी परळी येथील द कॉन्शन्स, २० रोजी नांदेडचे राहूल जोंधळे लिखित मृत्यूकडून जीवनाकडे, २१ रोजी परभणी येथील रविशंकर झिंगरे लिखित पुस्तकाच्या पानातून, २२ रोजी परभणी येथील रविशंकर झिंगरे लिखित विक्रमांचा घातांक क्ष, हे नाटके रसिकांना पाहण्यास मिळणार असल्याचे नाट्य स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी कळविले आहे़