नाट्यमय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:03 AM2020-12-31T04:03:56+5:302020-12-31T04:03:56+5:30

नववर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. समसमान मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात ...

Dramatic President and Vice President Election | नाट्यमय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक

नाट्यमय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक

googlenewsNext

नववर्षाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. समसमान मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात त्या विजयी झाल्या. उपाध्यक्षपदी भाजपाचे एल. जी. गायकवाड निवडून आले. त्यामुळे नेमका विरोधी पक्ष कोणता, याचे कोडे निर्माण झाले. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीही चुरशीची झाल्या.

---

झकास पठार विकास

---

जिल्ह्यातील पठारांचा कास पठाराच्या धर्तीवर विकास करण्यासाठी झकास पठार विकास कार्यक्रमाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी तयार केला आहे. रानफुलांची सलग लागवड केल्यास फुलांचे संवर्धन व संरक्षण होऊन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांनाही रोजगार संधी मिळेल. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकांनी कास पठाराचा अभ्यासदाैरे पूर्ण केले. पठारांच्या निवडीनंतर सारोळा, घाटनांद्रा, हळदा-डकला, शुलिभंजन, गाैताळा, आमखेडा, बहुलखेडा, फर्दापुर, जरंडी येथे बियाणे संकलनही करण्यात आले.

--

५९२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

---

कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ६१३ ग्रामपंचायतींवर टप्प्याटप्प्याने प्रशासक नियुक्त करण्यात येणार होते. ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होईपर्यंत ८६७ पैकी ५९२ प्रशासक नियुक्त केले गेले. अनेकांनी रुजू होण्यास नकार दिला होता. मात्र, कारवाईचा बडगा उगारताच सर्वच प्रशासक रुजू झाले. तर अनेकांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा सीईओंनी दम भरला.

---

जल जीवन मिशनचा कृती आराखडा मंजूर

---

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा ४९५ कोटी ७० लाख १७ हजार रुपयांचा जल जीवन मिशन कृती आराखडा स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. यात १२६७ गावांच्या १९५९ वसाहतीत शिल्लक असलेल्या २ लाख ३७ हजार १४७ नळजोडणी पुढील दोन वर्षांत करण्यात येईल. या माध्यमातून प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिदिन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याचे जल जीवन मिशनचे लक्ष्य आहे.

--

नव्या प्रशासकीय इमारतीच्या हालचालींना वेग

---

जि. प. मुख्य प्रशासकीय इमारतीचा गेल्या २० वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागला आहे. मागच्या बाजूस जिल्हा परिषदेची निर्विवाद पावणेतीन एकर जमीन आहे. या उपलब्ध जागेत ही इमारत बांधण्याचे सध्या नियोजन आहे. त्यासाठी या जागेवरील आरोग्य, पंचायत, कृषी, शिक्षण व स्वच्छता विभाग, स्वच्छतागृह, एनएचएम व पाणीपुरवठा विभाग पाडण्यासाठी मोजमाप करून अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. ४८.८३ कोटींच्या मंजूर १० हजार ८३८ चाैरस मीटरच्या बांधकामाचे, तीन मजली इमारतीच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले.

--

-जिल्ह्यात महाआवास योजनेचा प्रारंभ

-वाळूजला प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू

-तत्कालीन डीएचओ अमोल गिते यांचे निलंबन

-डीएचओपदी डाॅ. सुधाकर शेळके यांची नियुक्ती

-२०२ आरोग्य उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नेमले

-पंधराव्या वित्त आयोगाच्या ४९ कोटींचे दोन हप्ते जिल्ह्यात ग्रामपंचायतींना वितरण

Web Title: Dramatic President and Vice President Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.