सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आता आवाक्याबाहेर; स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:53 PM2020-12-11T13:53:11+5:302020-12-11T13:57:56+5:30

मागील महिनाभरात बांधकाम साहित्यात भाववाढ तेजीत आहे.

The dream of a common man's house is now out of reach; Prices of steel, cement and sand rate hiked | सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आता आवाक्याबाहेर; स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव गगनाला भिडले

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आता आवाक्याबाहेर; स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव गगनाला भिडले

googlenewsNext
ठळक मुद्देस्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव वाढल्याचा परिणाम सरकारी कामांनीही गती घेतल्याने मागणी व पुरवठ्यात तफावत

औरंगाबाद : देशात २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार बांधकाम क्षेत्र व घर खरेदीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती देत आहे. यामुळे बांधकामांनी गती घेतली आहे. सवलतींमुळे घर खरेदी सर्वसामान्य नागरिक पुढे येत असतानाच स्टील, सिमेंट व वाळूच्या किमती गगनाला भिडल्याने घर बांधकामाचे बजेट बिघडले आहे. सामान्य माणूस स्वत:चे घर बांधू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मागील महिनाभरात बांधकाम साहित्यात भाववाढ तेजीत आहे. सिमेंट ५० किलो गोणीमागे २० ते ४० रुपयांपर्यंत तेजी येऊन ३६० ते ४०० रुपये विकले जात आहे. स्टील किलोमागे ८ रुपयांनी भाव वधारून ५० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. लोखंडी पाईपचा भाव महिन्यापूर्वी ५८ रुपये किलो होता. यात तब्बल १२ रुपये वाढ होऊन ७० रुपये किलो विकले जात आहे. गुजरातमधील वाळूच्या भावात ३० टनाच्या गाडीमागे ६ हजार रुपये वधारून ४६ हजार रुपयांत मिळत आहे. अनधिकृत वाळूतही ६ हजार वाढून २२ टनाची गाडी २५ ते २६ हजार रुपयांत मिळत आहे. मात्र, याला खडी व विटा अपवाद ठरल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले की, साधारणतः १ हजार चौरस फूट बांधकामात सिमेंटच्या ६०० गोण्या, लोखंड ४ हजार किलो, वाळू ४० ते ५० ब्रास, खडी २० ते ३० ब्रास व ३० ते ४० हजार विटा लागतात. यामुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे. क्रेडाईचे उपाध्यक्ष नितीन बागडिया यांनी सांगितले की, अशीच परिस्थिती राहिली तर जानेवारी महिन्यापासून घराच्या किमती सुमारे १० ते २० टक्क्यांनी वाढतील.

मागणी वाढल्यामुळे भाववाढ
सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सवापासून बांधकामांनी गती घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांना वेळेत बांधकाम पूर्ण करून घराचा ताबा ग्राहकांना द्यायचा आहे. ३ टक्के मुद्रांक शुल्क कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना घ्यायचा आहे. यामुळे घरांना मागणी वाढली. परिणामी बांधकाम साहित्याला मागणी वाढली. सरकारी कामांनीही गती घेतल्याने मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.

कंपन्यांची एकाधिकारशाही
सिमेंट, लोखंडाच्या किमतीवर केंद्र, राज्य सरकारचे नियंत्रण नाही. यामुळे कंपन्या एकजूट होऊन मनमानी भाववाढ करतात. याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. सरकारने सिमेंट व लोखंडाच्या किमती आटोक्यात राहण्यासाठी हस्तक्षेप करावा. 
- विजय जयस्वाल, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

बांधकाम    लॉकडाऊन    नंतरचे 
साहित्य     आधीचे दर    दर
वाळू (३० टन)    ४००००    ४६०००    
खडी    २०००    २०००
विटा    ७०००    ८५००
स्टील    ४२.५०    ५८.७०
सिमेंट    ३१०    ४००

Web Title: The dream of a common man's house is now out of reach; Prices of steel, cement and sand rate hiked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.