चालकाचे नियंत्रण सुटून कार बंधाऱ्यात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 04:15 PM2021-10-12T16:15:01+5:302021-10-12T16:16:03+5:30

car crashed into the Bandhara in Aurangabad : या बंधाऱ्याचे नुकतेच खोली करण्याचे काम झाले आहे. यामुळे किमान ५० ते ६० फुट खोल पाण्यात कार बुडाली असल्याचा अंदाज आहे

The driver lost control and the car crashed into the Bandhara; Fear of drowning four members of the same family | चालकाचे नियंत्रण सुटून कार बंधाऱ्यात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची भीती

चालकाचे नियंत्रण सुटून कार बंधाऱ्यात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघे बुडाल्याची भीती

googlenewsNext

- श्रीकांत पोफळे

करमाड ( औरंगाबाद ) : नातेवाईकांची भेट आणि देवीच्या दर्शनासाठी मुळगावी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आज दुपारी २. ४५ वाजेच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाडसावंगी जवळील बंधाऱ्यात कार कोसळून (  car crashed into the Bandhara) त्यात चारजण बुडाल्याची भीती ( drowning four members of the same family)  व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात हिवरा-जडगाव रोडवरील जडगाव गावापासून ५०० फुटावर गावाजवळ झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचे शेलुद येथील वैद्यनाथ चौधरी औरंगाबाद येथे गजानन नगर येथे राहतात. मूळ गावातील नातेवाइक राजू वाघ यांची भेट आणि देवीचे दर्शन यासाठी वैद्यनाथ चौधरी, त्यांची पत्नी मंगल चौधरी, सुकन्या मधुर चौधरी आणि इतर एकजण कारमधून दुपारी औरंगाबाद येथून निघाले. लाडसावंगी-जडगाव मार्गे ते गावाकडे जात होते.

दरम्यान, जडगावाजवळील बंधाऱ्याजवळ अरुंद रस्ता आहे. यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार बंधाऱ्यात कोसळली. या बंधाऱ्याचे नुकतेच खोली करण्याचे काम झाले आहे. यामुळे किमान ५० ते ६० फुट खोल पाण्यात कार बुडाली आहे. ग्रामस्थ, पोलीस आणि अग्नी शमन दल यांचे मदत कार्य सुरु आहे. अद्याप कोणाचाही शोध लागू शकला नाही.

Web Title: The driver lost control and the car crashed into the Bandhara; Fear of drowning four members of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.