मराठवाड्यात नोटांचा दुष्काळ

By Admin | Published: June 2, 2016 11:41 PM2016-06-02T23:41:14+5:302016-06-02T23:49:08+5:30

औरंगाबाद : दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला म्हणूनच की काय, आता दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी शासनाने ३ हजार ९०० कोटी मंजूर केले खरे

Drought in Marathwada | मराठवाड्यात नोटांचा दुष्काळ

मराठवाड्यात नोटांचा दुष्काळ

googlenewsNext

औरंगाबाद : दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला म्हणूनच की काय, आता दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी शासनाने ३ हजार ९०० कोटी मंजूर केले खरे, पण एवढी मोठी रक्कम वाटण्यासाठी बँकेत नोटाच नाहीत. या चलन तुटवड्यामुळे रक्कम वाटपात विलंब होण्याची भीती मराठवाड्यातील सहकार उपनिबंधकांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर व्यक्त केली.
शेतकरी दुष्काळाने ग्रासलेले असताना त्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारी रक्कम पदरी पडणे मुश्कील झाले आहे. ३ हजार ९०० कोटी रुपये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यासाठी राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि खाजगी बँकांमध्ये येणाऱ्या चलनाचा (करन्सी) तुटवडा निर्माण झाल्यामुळे सगळे व्यवहार ठप्प होण्याची भीती विभागातील सहकार क्षेत्रातून गुरुवारी व्यक्त करण्यात आली. विभागातील पीक विम्याची मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण होत असताना बँकांकडे चलन नसल्याची कैफीयत उपनिबंधकांनी राज्यमंत्री भुसे यांच्यासमक्ष मराठवाड्यातील सहकार उपनिबंधकांनी विमा रक्कम कशी वाटप करायची, असा सवाल उपस्थित केला. नोटांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. विमा मूल्यांकन झालेले आहे. परंतु बँकांमध्ये चलन नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत ही रक्कम जाणे अवघड आहे. याप्रकरणी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यमंत्री भुसे यांच्याकडे करण्यात आली.

Web Title: Drought in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.