राज्यस्तरीय महा रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक डॉ.सिल्केषा अहिरे, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री देशपांडे

By साहेबराव हिवराळे | Published: May 15, 2023 09:08 PM2023-05-15T21:08:23+5:302023-05-15T21:08:49+5:30

छत्रपती संभाजीनगर : राज्यस्तरीय महा रांगोळी स्पर्धेत नाशिक येथील डॉ.सिल्केषा अहिरे व द्वितीय पारितोषिक पुणे येथील भाग्यश्री देशपांडे यांना ...

Dr.Silkesha Ahire, Second Prize Bhagyashree Deshpande in State Level Maha Rangoli Competition | राज्यस्तरीय महा रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक डॉ.सिल्केषा अहिरे, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री देशपांडे

राज्यस्तरीय महा रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक डॉ.सिल्केषा अहिरे, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री देशपांडे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राज्यस्तरीय महा रांगोळी स्पर्धेत नाशिक येथील डॉ.सिल्केषा अहिरे व द्वितीय पारितोषिक पुणे येथील भाग्यश्री देशपांडे यांना (दि.१४) भानुदासराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या घरासमोर रांगोळी काढा स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आली.या स्पर्धेत जात,धर्म विषमतेने फाटलेला भारत देश बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या धाग्याने शिवत आहेत हे डॉ.सिल्केषा अहिरे यांनी रांगोळीतून रेखाटले.

ही रांगोळीने प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. भाग्यश्री देशपांडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटले. तृतीय पारितोषिक ठाणे येथील विरेश वाणी यांना प्रदान करण्यात आले. विशेष प्राविण्य पुरस्कार कैलास खांजोडे, गणेश गोजरे, विलास रहाटे, डॉ.विशाखा राठोड यांना प्रदान करण्यात आला. बारा शस्त्रक्रिया झालेल्या असतांनाही इयत्ता पाचवीत शिकणारी मानसी जुवेकर या.दापोली,कोकण हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रांगोळी रेखाटली .या रांगोळीला विशेष प्राविण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,विचारवंत श्रीमंत कोकाटे ,प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे , पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याध्यक्ष सूर्यकांता गाडे, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीचे जनरल सेक्रेटरी इंजि. मिलिंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जस्टीस साधनाताई जाधव होत्या. याप्रसंगी नगर परिषदेचे प्रशासक नंदकिशोर भोंबे, पोलीस निरीक्षक व्यंकटराव केंद्रे, ॲड. अमरजीत सिंह गिरासे, नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण, पत्रकार सुनील गिरे, डॉ. सिताराम जाधव, प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम आदींची उपस्थित होती. प्रास्ताविक मिलिंद पाटील यांनी तर आभार प्रा.राजेंद्र नेवगे यांनी मानले.
 

Web Title: Dr.Silkesha Ahire, Second Prize Bhagyashree Deshpande in State Level Maha Rangoli Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.