औषधींचा साठा रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:11 AM2018-01-15T01:11:43+5:302018-01-15T01:12:36+5:30

पिशोर -औरंगाबाद रस्त्यालगत असलेल्या गौरपिंप्री खांडीत रविवारी चालू स्थितीतील सरकारी औषधींचा फेकलेला साठा आढळून आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार अजून एकदा समोर आला आहे.

 Drug storage on the road! | औषधींचा साठा रस्त्यावर!

औषधींचा साठा रस्त्यावर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिशोर : पिशोर -औरंगाबाद रस्त्यालगत असलेल्या गौरपिंप्री खांडीत रविवारी चालू स्थितीतील सरकारी औषधींचा फेकलेला साठा आढळून आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार अजून एकदा समोर आला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे याच खांडीत गेल्यावर्षी सुद्धा अशीच औषधी फेकण्यात आली होती. मात्र ती कालबाह्य होती. परंतु आता चक्क मुदतीत असलेली औषधी फेकण्यात आल्याने त्या घटनेशी काही साधर्म्य आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे.
गौरपिंप्री शिवारात वनविभागाच्या हद्दीत औरंगाबाद रस्त्यापासून ५० फूट आत झुडपामध्ये औषधींची अनेक पाकीट अस्ताव्यस्त पडलेली नागरिकांना दिसून आली. जवळ जाऊन पाहिले असता लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या जून २०१८ रोजी कालबाह्य होणाºया औषधी असल्याचे दिसून आले.
शनिवारी दुपारी जवळपास शंभरच्या आसपास ही पाकिटे आढळून आली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी पट्टे जाळल्याने यातील काही पाकिटे ही जळून गेली आहेत.
एकीकडे अनेक शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा असून ही औषधी कुणी व का फेकली याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे गौरपिंप्री येथील माजी सरपंच विजय सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, पद्मसिंग सूर्यवंशी, अरुण सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, सुरेश चौथमल, रणजीत सूर्यवंशी यांनी सांगितले.
आरोग्य अधिकारी म्हणतात... चौकशी करूया औषधी साठ्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी अनिल विडेकर यांनी सांगितले की, सदरील औषधी साठ्याच्या बॅच नंबरवरुन चौकशी करुन संबंधितास कारणे दाखवा नोटिस देण्यात येईल. तर पिशोर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले की, गर्भवती महिला व रक्तकमी असणाºया रुग्णांना वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत काही महिन्यांपूर्वी या गोळ्या वाटप करण्यात आल्या होत्या. आता त्या कुणी व का फेकल्या हे बॅच नंबरवरुन कळेल.
४सदरील ठिकाण हे नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून तेथील आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शेवगण यांना या साठ्याबाबत विचारणा करण्यात आली असून किती साठा मिळाला, किती वाटप झाला व किती शिल्लक आहे याची माहिती देण्यास सांगण्यात आले असल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी अनिल विडेकर यांनी सांगितले.

Web Title:  Drug storage on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.