नशेचे मध्यप्रदेश पाठोपाठ पुन्हा गुजरात कनेक्शन; ट्रॅव्हल्समधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:27 PM2024-11-06T15:27:59+5:302024-11-06T15:28:41+5:30

जामिनावर सुटताच पुन्हा नशेचे औषधी आणायला गेला; सूरतहून शहरात येताच १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत

Drugs Madhya Pradesh followed by Gujarat connection again; Three arrested with 1700 pills from travels | नशेचे मध्यप्रदेश पाठोपाठ पुन्हा गुजरात कनेक्शन; ट्रॅव्हल्समधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत

नशेचे मध्यप्रदेश पाठोपाठ पुन्हा गुजरात कनेक्शन; ट्रॅव्हल्समधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सुरतवरून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा घेऊन शहरात येणाऱ्या तीन कुख्यात तस्करांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नगर नाक्याला ट्रॅव्हल्स पोहोचताच पोलिसांनी सय्यद सलमान सय्यद सऊद (वय २७, रा. अल्तमश कॉलनी), माजिद बेग युनूस बेग (२४) व शेख अकबर शेख सलीम (२३, दोघे रा. बायजीपुरा) यांच्या मुसक्या आवळल्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले. 

पथकाने दिलेल्या माहितीनुसार, यातील सय्यद सलमान याला तीन महिन्यांपूर्वी एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीत अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो १५ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला. त्याच्यासह माजिदवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, जामिनावर सुटताच पुन्हा त्याने सुरतमधील विक्रेत्याला संपर्क करून गोळ्यांची ऑर्डर दिली.

बायजीपुऱ्यातील काही गुन्हेगार गुजरातच्या सुरतवरून नशेच्या औषधांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. पांढरे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप शिंदे यांनी पथकासह मंगळवारी सकाळी नगर नाक्यावर आरआर कंपनीची ट्रॅव्हल्स येताच थांबवण्यात आले. बेसावध असलेल्या तिघांना तत्काळ बसमधून ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्याकडे नशेखोरांकडून वापरल्या जाणाऱ्या १७०० गोळ्यांचा साठा आणि १० पातळ औषधांचा बाटल्या व एक नवीन खरेदी केलेला चाकू मिळून आला. अंमलदार विनोद परदेशी, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, सुनील बेलकर, नितीन देशमुख, सतीश हंबर्डे, राजाराम वाघ, सोहेल पठाण व प्रमोद सुरसे यांनी कारवाई पार पाडली.

एक लाख रुपये व्याजाने घेतले
कोणाला संशय येऊ नये म्हणून तिघांनी सुरतला होलसेल कपडे खरेदीसाठी बहाणा रचला. गोळ्यांसाठी एक लाख रुपये व्याजाने घेऊन ते सूरतला गेले होते. नव्याने खरेदी केलेल्या कपड्यांमध्ये हे औषधी व चाकू लपवला होता.

Web Title: Drugs Madhya Pradesh followed by Gujarat connection again; Three arrested with 1700 pills from travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.