आज दणाणणार ‘ती’चा ढोल - ताशांचा गजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:15 AM2017-09-03T00:15:46+5:302017-09-03T00:15:46+5:30
आजचा रविवार दुमदुमणार आहे, तो ‘ती’च्या ढोल-ताशांच्या गजरात.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आजवर गणेशोत्सवात केवळ आरतीची तयारी करण्याची जबाबदारी महिलांवर असायची. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती या उपक्रमापासून नियोजन ते प्रतिष्ठापना, अशी सर्वच धुरा ‘ती’च्या हाती देण्यात आली. मग ढोल- ताशांच्या वादनातही ‘ती’ मागे राहणे शक्य नाही. त्यामुळे आजचा रविवार दुमदुमणार आहे, तो ‘ती’च्या ढोल-ताशांच्या गजरात.
रविवारी (दि.३)‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत प्रोझोन मॉल येथे दुपारी १२ वाजता ढोल- ताशांच्या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की खास महिलांचे ढोल- ताशा वादनातील कौशल्य यामध्ये पाहायला मिळेल. गणेशोत्सवाला नवे चैतन्य, नवा उत्साह देणाºया या स्पर्धेचे सादरीकरण पाहायला प्रोझोन मॉल येथे अवश्य भेट द्या. प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत.
या उपक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी कुंदा पानसरे, कालिंदी इधाटे, मीना राठोड, रंजना देहाडे या घाटी येथील परिचारिकांच्या हस्ते (नर्स) ‘ती’च्या गणपतीची आरती करण्यात आली.
शनिवारी दुपारी बालगणेश स्पर्धा घेण्यात आली. ४ ते १५ वर्षांखालील मुले- मुली आणि त्यांच्या आईसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालकांनी गणपतीची, तर आईने पर्वतीची वेशभूषा केली होती. प्रीती सोनवणे व मुग्धा धारासूरकर यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रुती टेके आणि संस्कृत टेके यांनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर श्रीरंग रहाळकर व बागेश्री रहाळकर ही जोडी दुसºया क्रमांकाच्या बक्षिसाची मानकरी ठरली. सार्थक भोंडवे व अनुपमा भोंडवे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. धु्रव निंबाळकर व प्रीती निंबाळकर, चिन्मय कुलकर्णी व सीमा कुलकर्णी, अवनिश सूर्यवंशी व समृद्धी सूर्यवंशी या जोड्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया, स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करून आपले कर्तृत्व सिद्ध करणाºया महिलांना ‘सर्वगुणसंपन्न सखी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. पूनम सारडा, अर्चना सोनटक्के, प्रीती सोनवणे, सनवीर छाबडा, मुग्धा धारासूरकर यांना शनिवारी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पूनम सारडा यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रमही त्या प्रामुख्याने राबवीत आहेत. सनवीर छाबडा यांनी सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. अर्चना सोनटक्के या सेंट लॉरेन्स शाळेत मुख्याध्यापिका असून, शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. प्रीती सोनवणे या उद्योजिका असून, फॅशन डिझायनिंग क्षेत्रात त्या लोकप्रिय आहेत. मुग्धा धारासूरकर या प्रसिद्ध ब्युटिशियन असून, महिलांना सौंदर्याशी निगडित सल्ला देण्यासोबतच त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्या करतात.