वैजापुरात ‘ड्राय रन’ रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:05 AM2021-01-09T04:05:11+5:302021-01-09T04:05:11+5:30
वैजापूर : उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने न.पा. मौलाना आझाद विद्यालयात ‘कोव्हीड-१९’ लसीकरण सत्राअंतर्गत ‘ड्राय-रन’ रंगीत तालीम शुक्रवार (ता.०८) घेण्यात ...
वैजापूर : उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने न.पा. मौलाना आझाद विद्यालयात ‘कोव्हीड-१९’ लसीकरण सत्राअंतर्गत ‘ड्राय-रन’ रंगीत तालीम शुक्रवार (ता.०८) घेण्यात आली. एकूण तीस जणांनी या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला. कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन असेल. कार्यपद्धती कशी असेल याबाबत रंगीत तालीम पार पडली.
यावेळी तहसीलदार राहुल गायकवाड, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जि. प. आरोग्य समिती सभापती
अविनाश गलांडे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, प्र, तहसीलदार निखिल धुळधर,
नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन इंदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राजपूत आदींची उपस्थिती होती.
--------
अशी आहे रचना
रंगीत तालीम मध्ये स्वागत कक्ष, लस टोचणी खोली, विश्रांती कक्ष याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. सॅनिटायझर व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे. कोरोना लसीकरण समयी कशी काळजी घेतली जाणार आहे. याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. शहरात पाच ठिकाणी व ग्रामीण भागात १४ जागेवर लसीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. १४ ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरण व्यवस्था असेल असे डॉ. टारपे यांनी सांगीतले.
------------
फोटो कॅप्शन - कोरोना लसीकरण रंगीत तालीम कार्यक्रमात सहभागी झालेले जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, तहसीलदार राहुल गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉय टारपे यांची उपस्थिती होती.