कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 12:43 AM2016-08-25T00:43:57+5:302016-08-25T00:55:46+5:30

जालना : शहरासह जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कृष्ण मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Due to the birth of Lord Krishna Janmashtami | कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दर्शनासाठी गर्दी

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दर्शनासाठी गर्दी

googlenewsNext


जालना : शहरासह जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कृष्ण मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अभिषेक, भजन, आरती व कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. मंदिरांमध्ये फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती.
मस्तगड येथील महानुभव दत्त मंदिरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. वृंदावन कॉलनीतही दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी वेशास अजिंक्य महाराज देशमुख यांच्या पौरोहित्याखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे कीर्तन पार पडले. दुपारी सुमन नामेवार यांच्या वतीने गीतापाठ तसेच भजनाचा कार्यक्रम पार पडला. गणपती गल्ली येथील कृष्ण मंदिरातही धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी महिला मंडळाचे भजन झाले.
जन्माष्टमी व गोपाळकाल्यानिमित्त मंदिरात फुलांची आरास तसेच विद्युत रोषणाई केली आहे. गुरूवारी होणाऱ्या गोपाळ काल्यासाठी विविध मंदिरांसोबत संघटना व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

Web Title: Due to the birth of Lord Krishna Janmashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.