ब्रेक फेल झालेल्या बसने चार रिक्षा, दुचाकी आणि कारला ठोकरले, एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:56 PM2017-10-16T18:56:50+5:302017-10-16T19:02:58+5:30

प्रवाशी घेऊन  बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने चार रिक्षा, एक दुचाकी आणि कारला ठोकरले. यावेळी बसने चिरडल्याने एक जण ठार झाला तर दोन गंभीर जखमी झाला.

Due to break failure bus hit four rickshaws, one twowheelers and a car, killed at one place | ब्रेक फेल झालेल्या बसने चार रिक्षा, दुचाकी आणि कारला ठोकरले, एक जागीच ठार

ब्रेक फेल झालेल्या बसने चार रिक्षा, दुचाकी आणि कारला ठोकरले, एक जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको चौकातील भीषण घटनावसंतराव नाईक चौकाच्या दिशेने बस पुढे निघाताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.एक जण जागीच ठार , एक गंभीर

औरंगाबाद : प्रवाशी घेऊन  बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने चार रिक्षा, एक दुचाकी आणि कारला ठोकरले. यावेळी बसने चिरडल्याने एक जण ठार झाला तर दोन गंभीर जखमी झाला. ही भीषण दुर्घटना  सायंकाळी ४.२० वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकाकडून वसंतराव नाईक चौकाकडे जाताना कॉर्नरवर घडली.

या घटनेत मरण पावलेल्या आणि जखमींची व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून  अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ४.२० वाजेच्या सुमारास विना वाहक एस.टी. बस क्रमांक (एमएच-४०एन ९७६८)सिडको बसस्थानकातून  प्रवाशी घेऊन बीडला निघाली. बसस्थानकातून जळगाव रोडने वसंतराव  नाईक चौकाच्या दिशेने बस पुढे निघाताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.मात्र वेगातील बसने समोर असलेल्या दुचाकीस्वाराला उडवले, यानंतर एकापाठोपाठ चार रिक्षा आणि ड्रायव्हींग स्कुलच्या कारला ठोकरले. यावेळी दोन रिक्षा सिनेमास्टाईल उडून बाजुला पडल्या तर एका रिक्षाला सुमारे १० फुट फरपटत नेल्याने रिक्षासह बस वाहतूक सिग्नलच्या खांबाला अडकली आणि थांबली.या घटनेत एक जण ठार झाला तर अन्य दोन गंभीर जखमी झाले. यावेळी बसच्या चाकाखाली एक जण अडकून जागीच ठार झाला. त्याचा मेंदू बसखाली विखुरला आणि रक्ताचे थारोळे घटनास्थळी साचले. या अपघाताच्या आवाजाने चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस आणि रिक्षास्टॅण्डवरील रिक्षाचालकासह नागरीक मदतीसाठी धावले. यावेळी बसमधून उतरून बसचालक घटनास्थळावरून पसार झाला.
 

Web Title: Due to break failure bus hit four rickshaws, one twowheelers and a car, killed at one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.