डीपीच्या श्रेयवादावरून राजकारण पेटतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:35 PM2017-11-23T23:35:28+5:302017-11-23T23:36:11+5:30
महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.
रोहित्राअभावी शेतातील उभ्या पिकाची राख होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला असून महावितरणचे खेटे घेत आहे. तर काहीजणांनी रोहित्र आमच्यामुळेच मिळत आहे, असे शेतकºयांना भासवून गेटपास देत असल्याचा आरोप करीत २३ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी महावितरणच्या अधिकाºयांना धारेवर धरले.
सवना, खंडाळा, करंजाळा सावळी येथील शेतकरी रोहित्रांसाठी महाविरतण कार्यालयात आले होते. परंतु आॅईलचा तुटवडा असल्याने अनेक शेतकरी कार्यालय परिसरातच बसून होते. लिंबाळा मक्ता येथील एमआडीसीत काहीजण रोहित्र देण्यावरून श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदारांचे सहकारी, पीए हे गेटपास देऊन रोहित्र आम्हीच देत आहोत असे भासवत असल्याचा आरोप बांगर यांनी केला. शिवसेना शेतकºयांच्या हितासाठी लढते व लढत आहे, त्यामुळे फुकट श्रेय घेणाºयांनी हा बाजार बंद करावा, असेही ते म्हणाले. यावेळी अधिकारी मात्र चांगलेच भांबाऊन गेले होते.