थकबाकीमुळे जालना जिह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:07 PM2018-02-22T14:07:19+5:302018-02-22T14:08:04+5:30

महावितरणाच्या औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

Due to the defaulter, mahavitaran cuts 45 villages power supply in Jalana | थकबाकीमुळे जालना जिह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा खंडित 

थकबाकीमुळे जालना जिह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा खंडित 

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणाच्याऔरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे वसुलीसाठी संबधीत ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.

औरंगाबाद परिमंडळातील जालना जिह्यात विभाग-१ व २ अंतर्गत वीजबिलाची थकबाकी वाढती आहे. याची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहिम हाती घेतली आहे. जिल्हातील अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर या उपविभागात २२४५ ग्राहकांकडे जवळपास  ४ कोटी २१ लाख ८८ हजार रुपयाची थकबाकी आहे.  या ग्राहकांनी मागील तीन ते चार वर्षापासून वीज देयक भरली नाहीत. यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या सोबतच या ग्राहकांचे वास्तव्य असलेल्या या ४५ गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला आहे. 
त्याचा उपविभागनिहाय तपशील खालील प्रमाणे आहे.

उपविभाग          ग्राहक संख्या 
अंबड                    ६७६ 
घनसावंगी            ७९१ 
मंठा                      ३६० 
परतूर                   ३५३ 
जालना ग्रामीण     ६५ 

Web Title: Due to the defaulter, mahavitaran cuts 45 villages power supply in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.