"नीट’ सर्वर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 07:57 PM2017-04-22T19:57:08+5:302017-04-22T19:57:08+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षा मे महिन्यात होणार आहे. या परीक्षेची हॉलतिकिट शनिवारी ऑनलाईन टाकण्यात आले.
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षा मे महिन्यात होणार आहे. या परीक्षेची हॉलतिकिट शनिवारी ऑनलाईन टाकण्यात आले. मात्र ‘सीबीएसईएनईईटी’ ही वेबसाईटचे सर्वर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकिट मिळालेच नाहीत. या प्रकारामुळे उत्सुकता असलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशपातळीवर राष्ट्रीय
प्रवेश पात्रता चाचणी परीक्षा घेण्यात येते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ही परीक्षा देशभरातील १०३ शहरातील केंद्रांवर ७ मे रोजी घेण्यात येणार आहे. सीबीएसईने १५ एप्रिल रोजीच हॉलतिकिट वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काही तांत्रिक आडचणींमुळे हॉलतिकिट शनिवारी (दि.२२) वेबसाईटवर आपलोड करण्यात आले आहेत. मात्र सकाळी ८ वाजल्यापासूनच वेबसाईटचे सर्वर डाऊन झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकिट मिळविण्यात आडचणी येत आहेत. परीक्षा आवघ्या १५ दिवसांवर आलेली असतानाच हॉलतिकिटसाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करावी लागत आहे.
‘सीबीएसई’कडे तक्रारींचा पाऊस
नीट परीक्षेची हॉलतिकिट मिळविण्यात आडचणी येत असल्याच्या तक्रारी परीक्षार्थींनी ‘सीबीएसई’कडे इमेल, फोनद्वारे केल्या आहेत. या तक्रारींची तात्काळ दखल न घेतल्यास अनेक शहरांमध्ये आंदोलने होण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
दहा भाषा, साडेआकरा लाख विद्यार्थी
देशभरात नीट परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बांग्ला, आसामी, तेलगु, तामिळी आणि कन्नड या दहा भाषांमध्ये होणार आहे. या परीक्षेला देशभरातून ११ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अवेदनपत्र भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षार्थींच्या संख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी लावण्यात येणार असल्याचेही ‘सीबीएसई’ने जाहीर केले आहे.