मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:27 AM2018-09-20T01:27:21+5:302018-09-20T06:42:19+5:30

पावसाचे प्रमाण केवळ ५० टक्केच

Due to drought in 12 villages in Marathwada | मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट

मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील बाराशेंपेक्षा जास्त गावांवर दुष्काळाचे सावट असून खरीप हंगामातील पीक हातचे जाण्याची भीती आहे. विभागात सुमारे ८ हजार ५०० गावे असून त्यातील ५९ मंडळांमधील १२०० पेक्षा जास्त गावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
पावसाअभावी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. परभणीतील १ मंडळ पूर्णत: अवर्षणग्रस्त झालेले आहे. तर ५९ मंडळांत पावसाने दगा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७०० गावे, जालना- ४२०, परभणी - ३८०, हिंगोली - २००, नांदेड -४३०, बीड - ५००, लातूर- ४८० तर उस्मानाबादच्या ४४० गावांमध्ये टंचाई निर्माण होऊ शकते.

Web Title: Due to drought in 12 villages in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.