घरातील फरशी तापल्याने गूढ वाढले

By Admin | Published: May 27, 2017 12:39 AM2017-05-27T00:39:17+5:302017-05-27T00:41:48+5:30

जाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Due to heat from the house, mystery has increased | घरातील फरशी तापल्याने गूढ वाढले

घरातील फरशी तापल्याने गूढ वाढले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील एकाच ठिकाणची फरशीवर उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे ज्वालामुखी आहे की पाण्याच्या वाफेमुळे होतेय याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवीस वर्षांपूर्वी किल्लारी भूकंपाच्या वेळेस गावात सौम्य धक्के जाणवले होते.
भिमराव किसनराव अंभोरे यांचे गावात भर वस्तीत घराचे पाच वर्षां पूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. याच घरात बैठक खोलीला लागून एक खोली आहे. उन्हाळ्यातील गरमीचे दिवस असल्याने भागूबाई भीमराव अंभोरे या रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून घरात आले असताना खोलीतील फक्त बारा फरशा तापल्याचे लक्षात आले.
एकाच ठिकाणी फरशी तापल्याचे पाहून एक फरशी खोदून काढली असता खोदकाम केल्याच्या ठिकाणी पाणी टाकून पाहिली असता पाणी सुद्धा गरम झाले. त्यामुळे घरातील सदस्य आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
या गूढ घटनेची माहिती तहसील कार्यालयासही कळविण्यात आली. मंडळ अधिकारी एस. डी. भदरर्गे, तलाठी विजय गरड, व्ही. आर. इंगोले, अ‍ॅड रामेशवर अंभोरे, माजी सरपंच विजय अंभोरे यांनी घटना स्थळाची पाहणी करून याची माहिती तहसीलदार यांना दिली. या विषयी तहसीलदार जे.डी.वळवी म्हणाले याची माहिती पोलिसांना दिली आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाला माहिती देण्यात येऊन सद्या स्थितीत घरातील कुटुंबास सावध राहून तात्पुरती इतरत्रे व्यवस्था करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Due to heat from the house, mystery has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.