अतिपावसामुळे डाळी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:25 PM2020-09-27T17:25:19+5:302020-09-27T17:27:40+5:30

डाळींचे भाव किलो मागे ६ ते १० रुपयांनी वाढले आहेत.

Due to heavy rains, pulses became expensive | अतिपावसामुळे डाळी कडाडल्या

अतिपावसामुळे डाळी कडाडल्या

googlenewsNext

औरंगाबाद: अतिपावसामुळे मूग, उडीद खराब झाल्यामुळे यंदा डाळींचे भाव कडाडले आहेत. तसेच यंदा विदेशातून हरबऱ्याच्या आयातीवर परिणाम झाला. त्यात धोंड्याच्या महिन्यात पुरणाला महत्त्व असल्याने हरभरा डाळीलाही मागणी वाढली आहे. परिणामी डाळींचे भाव किलो मागे ६ ते १० रुपयांनी वाढले आहेत.

मागील आठवड्यात ८४- ८६ रू या दराने मिळणारी हरबरा डाळ या आठवड्यात ९६-९८ रूपयाने मिळते आहे. उडीद डाळीचा भाव ९०- ९२ रूपयांवरून १०८- ११० रू. झाला असून मूग डाळ ९०- ९२ रूपयांवरून ९६- ९८ रूपये एवढी वधारली आहे. तर मठाची डाळ ११०- ११२ रूपये, मसूर डाळ ७८- ८० रू.  तर बेसन ८६-९० प्रतिकिलो झाले आहे.

Web Title: Due to heavy rains, pulses became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.